विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड :पंचायत समिती उमरखेड अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा कोपरा खुर्द या ठिकाणी एक ते पाच पर्यंत शाळा असून या ठिकाणी फक्त एक शिक्षिका कार्यरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात दिसत आहे .शाळा व्यवस्थापन समिती यांनी गटशिक्षणाधिकारी उमरखेड यांना 23 जून 2023 रोजी पत्राद्वारे एका शिक्षकाची मागणी केली आहे. परंतु ती मागणी लवकरात लवकर कायमस्वरूपी शिक्षक देण्यात यावा ही विनंती पालक वर्ग करत आहे. या ठिकाणी शाळेची अशी सुंदर इमारत असून फक्त शिक्षकाची कमी आहे. एक शिक्षिका कार्यरत असल्याने त्यांनाही ऑफिसच्या कामासाठी वारंवार उमरखेडला जावे लागत आहे. असे त्यांनी सांगितले आहे. आमच्या प्रतिनिधींनी ज्यावेळेस शाळेला भेट दिली त्यावेळेस एकाच खोलीत पहिली ते चौथी पर्यंतचे विद्यार्थी बसवले होते त्याच्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्ट्या नुकसान होत आहे या गोष्टीची दखल शिक्षण विभागाने घेणे अत्यंत गरजेचे असून अशा प्रकारे जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर असून खाजगी शाळा यांना प्रोत्साहन देण्याचे काम सरकार करत आहे. काय असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे .

