बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
दौंड:दिनांक २५ रोजी दुपारी 12 वाजता दौंड शहरातील महात्मा फुले पुतळा मार्ग, डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळा,महात्मा गांधी पुतळा,छञपती शिवाजी महाराज पुतळा मार्ग, संविधान चौकात ईशान्य भारतातील मणिपूर मध्ये महिलांची विवस्त्र करून धिंड काढणे,हत्याकांड,जातीपातीच्या नावाखाली हिंसाचार पसरवणे अश्या ज्या काही घटना नराधमांनी 2-3 महिन्यापासून त्याठिकाणी केलेल्या आहेत अशा नराधमावर केन्द्र सरकार, मणिपूर सरकारने कारवाई करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी,ज्या महिलांची हत्या केली त्याच्या घरातील एकाला शासकीय नोकरी, घरे जाळली आहेत त्यांना शासनाने घरे बांधून देणे तसेच मणिपूर सरकारने आर्थिक मदत करावी तसेच दौंड तालुक्यातही या जातीयवादी सरकारकडून विशिष्ट समाजातील लोकांना टार्गेट केले जाते तर येथून पुढे हे होऊ नये अश्या मागण्या घेऊन आंदोलक रस्त्यावर उतरले होते त्यात पुरुषाबरोबर, महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती त्यावेळी नागसेन धेंडे, अश्विन वाघमारे, अमित सोनवणे, मतीनभाई, फादर बेंजामिन तिवारी,रतन जाधव, भारत सरोदे, पगी मॅडम ,उमेशभैय्या म्हेञे,दिपकभाऊ सोनवणे, राजेश गायकवाड, आण्णा धुमाळ, शहनावाज शेख, डाॅ जगताप,सारिका भुजबळ, राजश्री दोरगे निलेश बनकर व ईतर मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता .