डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : दि.25 मंगळवार रोजी शहरातील न्यु हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात “हात मदतीचा”या सामाजिक उपक्रमा अंतर्गत तुमच्या आमच्या सहकार्यामुळे ४१ विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप के.पी. चौधरी तालूका आरोग्य अधीकारी व संजय सुरवाडे पोलीस निरीक्षक रेल्वे स्टेशन यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेस अभिवादन करून व या उपक्रमाचे प्रेरणास्थान अखिल भारतीय साने गुरूजी कथा मालेचे कै.दत्तात्रय हेलसकर यांना स्मरून सुरूवात करण्यात आली.या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन शालेय समिती सदस्य संतोष कुलकर्णी, प्रमुख पाहुणे के.पी.चौधरी तालूका आरोग्य अधीकारी, संजय सुरवाडे पोलीस निरीक्षक रेल्वे स्टेशन माजी मुख्याध्यापक दत्तात्रय माकोडे, जेष्ठ समाजसेवक पद्माकराव कुलकर्णी, डाॅ अशोकराव नाईकनवरे,ॲड.अशोकराव फोपसे, संयोजक सुनिल गायकवाड, प्रशांत ठाकूर, शेख साजिद, पि.के.शिंदे, शुकाचार्य शिंदे, पर्यवेक्षक धनंजय भागवत, मुख्याध्यापक एम एम कसबे आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संयोजक शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड यांनी केले ते म्हणाले कि कै. दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रेरणेतुन सुरू असलेला हात मदतीचा उपक्रम हा मागील पाच वर्षांपासून अविरत सुरू असून या वर्षी उपक्रमास सहा वर्ष पूर्ण झाले असून आत्तापर्यंत शहरातील २३३४ विद्यार्थ्यांपर्यंत हात मदतीचा या उपक्रमातून शैक्षणिक साहित्याची मदत केलेली आहे.तर या वर्षांपासून महाविद्यालीन एक पालक आणि गरजवंत विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
हा हात मदतीचा उपक्रम हा शहरातील दानशूर नागरीकांचा आहे.माझ्यावर जो विश्वास आजपर्यंत एकनिष्ठे टाकला तो विश्वास मी सार्थकी लावेल.असे मुख्य संयोजक सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी सांगीतले तर प्रमुख पाहुणे पि.के.चौधरी म्हणाले की समाजात अनेक हात मदत करण्यास तयार आहेत परंतु आपण मदत कोणाकडे द्यायची हा मोठा प्रश्न आहे परंतु शहरात आपला माणूस म्हणून परिचित असलेले सामान्य भाजीचा छोटासा व्यवसाय करत आपण समाजाचे काही देणे लागतो या हेतुने सुनील गायकवाड यांनी दानशूर व्यक्तींना भेटून सहकार्य घेऊन हा उपक्रम राबवला मागील ५ वर्षांपासून दानशूर व्यक्तींनी सुनिल गायकवाड यांच्यावर विश्वास दाखवत हा उपक्रम राबवला आहे. दानशूर व्यक्तीने आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमास संतोष कुलकर्णी, संजय सुरवाडे,धनंजय भागवत, आदिनी मनोगत व्यक्त करत स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक सुनिल गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन शेषराव नागरे यांनी तर आभार रामेश्वर गाडेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशश्वितेसाठी शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले.