शेषराव दाभाडे
तालुका प्रतिनिधी,नांदुरा
नांदुरा : वंचित बहुजन आघाडी जळगांव यांनी यांच्या कडून महसुल विभागास पुरग्रस्तांना तात्काळ मदत व लवकर पंचनामे करण्यास यंत्रणा राबवण्यासाठी निवेदन ह्या अधिका-यांशी चर्चा करण्यात आली ७२ तासात जर संपुर्ण प्रकरणे निकालात काढले नाहीत तर तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला.तसेच शहरातील विवीध भागात पुरग्रस्त परीस्थीतीची कार्यकर्त्यांसह पाहणी करुन पुरग्रस्तांना दिलासा देत त्यांना योग्य त्या सेवा सुविधा देण्यासाठी संबंधीत अधिका-यांसोबत चर्चा करण्यात आली. जर यंत्रणेने काम योग्य केले नाही तर वंचित बहुजन आघाडी , जळगांव जा. पुढचे ठिय्या आंदोलन तिव्र पध्दतीने करणार आहे.संबंधित निवेदन संतोष गवई तालुकाध्यक्ष , वंचित बहुजन आघाडी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यानी तहसील कार्यालयास निवेदन दिले.











