मधुकर केदार
तालुका प्रतिनिधी शेवगाव
ढोरजळगाव :शेवगाव तालुक्यातील आखतवाडे येथील सुमारे दीडशे पीएम किसान योजनेतील लाभार्थ्याचे अनुदान बंद झाले असूनही ते तात्काळ सुरू करण्यात यावे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीची नुस्कान भरपाई मिळावी या मागणी करता किसान सभेचे वतीने आखतवाडे फाटा शेवगाव पांढरीपूर राज्य मार्ग या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉम्रेड सुभाष लांडे कॉम्रेड बापूराव राशिनकर कॉम्रेड संजय नांगरे यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध प्रशासनाला जाब विचारला व पी एम किसान लाभार्थ्यांना योजनेचा लाभ पूर्ववत करण्यात यावा.यासाठी किसान सभेचे वारंवार पाठपुरावा आंदोलने करूनही दखल न घेतल्याबद्दल प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान अद्याप न मिळाल्याने शेतकरी यावेळी बोलताना संतप्त झाले होते.या आंदोलन प्रसंगी सेवा संस्थेचे मा चेअरमन रघुवीर उगले,कामगार तलाठी प्रदीप मगर,श्रीरंग राशिनकर, केशव उगले,गणेश भागवत,दिगंबर उगले,विठ्ठल उगले,साईनाथ मामा भुसारी,केशव उगले, सुदाम उगले, आधी सह ग्रामस्थ उपस्थित होते.


