शेषराव दाभाडे
तालुका प्रतिनिधी,नांदुरा
18 जुलै च्या रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने नांदुरा तथा मलकापूर तालुक्या तील शेती व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. दिनांक 20 जुलै रोजी आमदार राजेश एकडे यांनी विधानसभेला न जाता थेट आपला मतदारसंघ गाठत नांदुरा तालुक्यातील निमगाव,अलमपूर, पळसोडा, खुमगाव, भिलवडी,धाडी, मामुलवाडी, येरळी, नवी एरळी, मलकापूर तालुक्यातील वाघुड,वडोदा, पान्हेरा,बेलाड, या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन शेतकऱ्याचे सांत्वन करीत प्रशासनाला मदतीचे निर्देश दिले. दिनांक 21 जुलै रोजी सलग दुसऱ्या दिवशी आमदार राजेश एकडे यांनी विधानसभेत न जाता शेतकऱ्यांच्या बांधांवर जाणे पसंत केले. जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड साहेब, उपविभागीय अधिकारी देशमुख, तहसीलदार सौ नारखेडे, राजेंद्र सुरळकर, गटविकास अधिकारी समाधान वाघ, उद्धव होळकर, तालुका कृषी अधिकारी निमकर्डे व सूर्यवंशी दोन्ही तालुक्या मधील अधिकारी यांच्या समवेत आमदार राजेश एकडे यांनी, वडनेर,चांदूर बिस्वा, डीघी, हिंगणे गव्हाळ, मामुलवाडी, वडगाव, सावरगाव, मोमिनाबाद, पान्हेरा, शिरसोडी, विटाळी, या गावांना भेटी देत शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांच्या मदती संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून अधिकाऱ्यांना मदती संदर्भात निर्देश दिले तर मामुलवाडी येथे मुसळधार पावसाने अंगावर गोठ्याची भिंत पडून मृत्युमुखी पडलेल्या प्रताप गावंडे यांचे घरी सांत्वन पर भेट देऊन त्याच्या परिवारास शासनाकडून सानुग्रह अनुदान म्हणून रुपये चार लाखाचा धनादेश प्र दा न केला यावेळी त्यांचे समवेत महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.