शरद भेंडे
तालुका प्रतिनिधी अकोट
अकोट- १ जुलै ते १५ जुलै स्वच्छता पंधरवाडा निमित्त सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वय मंत्रालय विभागा द्वारा नुकतीच ग्रा.पं.चंडीकापुर ला भेट देण्यात आली.यावेळी स्वच्छते संदर्भात एम.एस.मुळे प्रभारी वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी अकोला यांच्या मार्गदर्शनात जनजागृती पर कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाला सरपंच मनिषा जवंजाळ उपसरपंच तुषार अढाऊ व ग्रा.पं.सदस्य राजकुमार खंडेराव,सौ.प्रमीला अढाऊ,सौ.प्रीति लोखंडे,अनिल नितोने,मंगेश चव्हाण इ.सह ग्रा.पं.सचिव व गावातील प्रतिष्ठित नागरिक हजर होते.तसेच आरोग्य विभाग व अंगणवाडी विभागातील सर्व कर्मचारी व सांख्यिकी विभागांचे सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन उपसरपंच तुषार अढाऊ यांनी केले.