विश्वास काळे
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड :महागाव तालुक्यात कोनदरी वाकान शिवारात वाघाचा संचार असल्याचा शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले .असून शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कोनदरी वाकान शिवारात लहान तळ्याच्या काठी डोंगर परिसरात 13 जुलै रोजी सायंकाळी 6.00 वाजता तळ्याच्या काठी वाघ दिसून आला ,अशी खळपण जनक बाब शेतकऱ्यांच्या समोर आली, असून अनेक शेतकऱ्यांच्या शेताला जाणारा रस्ता तळाला लागून जातो, हा रस्ता पार करून शेतकऱ्याला माळ चढावा लागतो .आणि काही शेतकऱ्याचे शेत तळाला लागून असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाल ,असून या वाघाचा बंदोबस्त तात्काळ करण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सचिव विशाल पवार यांनी केली आहे .तात्काळ बंदोबस्त न केल्यास शेतकऱ्याला वाघाकडून काही हानी झाल्यास वनपरिक्षेत्र विभाग यांच्यावर संपूर्ण जबाबदारी राहील अशी माहिती निवेदनाद्वारे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे देण्यात आली आहे.