मनोज कामडी
तालूका प्रतिनिधी ,जव्हार
कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, डहाणू मार्फत खरवंद ता जव्हार येथे यांत्रिक पध्दतीने भात लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यासाठी अगोदर शेतकऱ्यांना एक महिन्यांपूर्वी शाश्रज्ञ भरत कुशारे यांनी भात ट्रे रोपवाटिकेचे प्रशिक्षण दिले आणि रोपवाटिका तयार करून घेतली, तसेच रत्नागिरी ७ या लाल भाताचे बियाणे गावातील निवडक शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. या भागात भात शेतीच्या अनेक समस्या येत असून त्यामध्ये जमीन मशागत, रोप तयार करणे, चिखळणी, अवणी वेळेत होणे आंतरमशागत इ यांपैकी सर्वात जास्त मजूर भात आवणी करण्यासाठी लागतात आणि ते ही वेळेवर उपलब्ध होत नाही.भात आणि मजूर एक समीकरण आहे . सध्या भात शेतीतील मंजूर टंचाई ही एक मोठी समस्या बनत चाललेली आहे. म्हणूनच जर या समस्येवर मात करण्यासाठी भात शेतीत यात्रिकीकरण करणे एक चांगला पर्याय आहे. म्हणून गोखले एज्युकेशन सोसायटीचे कृषी विज्ञान केंद्र , कोसबाड हिल यांच्यामार्फत जव्हार तालुक्यातील आदिवासी शेतक-यांच्या शेतावर स्वयंचलित वॉक बिहाइंड टाइप चार ओळीच्या यंत्राद्वारे भात लागवड प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमाने आयोजन करण्यात आले होते. यावेळी भरत कुशारे शाश्रज्ञ यांनी भात ट्रे रोपवाटिकेचे यांत्रिक लागवडीसाठी असलेलं महत्त्व सांगितले आणि त्या साठी काय काळजी घ्यावी, व्यवस्थापन कसे करावे याविषयी माहिती दिली. तसेच अनुजा दिवटे शाश्रज्ञ यांनी आदिवासी शेतकऱ्यांना यांत्रिक भात लागवड मशीन विषयी माहिती दिली आणि लागवड करताना काय काळजी घ्यावी, दोन रोपांतील अंतर, तसेच चिखळणी कशी केलेली असावी याविषयी माहिती देण्यात आली. खरवंद गावात तीन एकरवर यांत्रिक पध्दतीने भात लागवड करण्यात आली.सदर कार्यक्रमास तालूका कृषि विभाग जव्हार कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कोट-
या यंत्राद्वारे ओळीत लागवड करता येत असून एका दिवसात २ ते ३ हेक्टर क्षेत्रावर लावणी होवू शकते. त्यासाठी एकरी १ ते १.५ लिटर पेट्रोल लागते. तसेच पारंपरिक पद्धतीने भात लावणी करण्यासाठी जवळपास हेक्टरी ७५ते ८० मजूर लागतात. त्या तुलनेत यंत्राद्वारे केवळ २ मजुरांद्वारे भात लावणी होते. त्यामुळे मजुरी खर्चात ९० टक्के पर्यंत बचत होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन २० ते २५ टक्के वाढण्यास मदत होते. तसेच मजुरी खर्चात, बियांनांची, वेळेची आणि श्रमाची बचत होते. हे यंत्र वापरण्यास सुलभ असून मशीनची किंमत २.८० ते ३.०० लाख आहे.जर दोन ते तीन गावा मध्ये एक जरी मशीन उपलब्ध झाले तरी २०० ते २५० एकर क्षेत्र एक मशीन एका हंगामात नियोजन करून यांत्रिक पद्धतीने भात लागवड करू शकतो त्याद्वारे स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल तसेच वेळेस आवणी झाल्यास भात उत्पादन सुध्दा वाढेल.
- भरत कुशारे शाश्रज्ञ कोसबाड पालघर
“कोट-
“आम्हाला एकरी केवळ ९० ट्रे भात रोपवाटिका चे लागवड करण्यासाठी लागले आणि एक तासांत लागवड पूर्ण झाली .जी पारंपरिक पद्धतीने ३० माणसे एकरी लागत होती आणि दोन दिवस वेळ द्यावा लागत होतात, तसेच आवणी साठी मजुरांना मजुरी व्यतिरिक्त जेवण वैगरे द्यावे लागत होते, ती मेहनत पण वाचली यांत्रिक पध्दतीने भात लागवड खुप चांगली पद्धत, शेतकऱ्यांची मजुरी आणि वेळ वाचते ,ट्रे रोपवाटिका आणि मशीन लागवडीने आमची ढोर मेहनत वाचली,आता आम्हाला उत्पादन किती येते याविषयी कुतूहल आहे .”
- विष्णू चौधरी शेतकरी खरवंद
“पुढील वर्षी आम्ही शेतकरी किमान १० एकर यांत्रिक पद्धतीने भात लागवड करणार आहोत आणि इतरांना ही त्यांचे महत्त्व सांगणार आहोत.आमचा वेळ, श्रम, बियाणे खर्च वाचला आणि सर्वात महत्त्वाचे आवणी वेळी जे आरोग्य बिघडते ते आता बिघडणार नाही.शेतीसाठी झाडाचा फांद्या तोडणे, शेण पालापाचोळा पसरवणे ,आणि राब भाजणे ही मेहनत वाचली ,तसेच बियाणे बचत आणि वेळेची बचत भात ट्रे रोपवाटिकेमुळे झालीआणि सदर ट्रे भात रोपे मशीन ने लागवड केल्याने वेळ, मजूर आणि पैशाची बचत झाली.”
- सदाशिव राऊत ( प्रगतशील शेतकरी खरवंद)


