जहांगिर झाडे
ग्रामीण प्रतिनिधी, वरोरा
वरोरा : वरोरा तालुक्यातील दादापूर ग्रामपंचायत च्या हलगर्जी पनाचा फटका पुन्हा एकदा गावकऱ्यांना भोगावा लागणार आहे. ग्रामपंचायत ने केलेल्या चुकीच्या कामामुळे संपूर्ण दादापूर ग्रामवासियांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सविस्तर वृत्त या प्रमाणे कि ग्रामपंचायत दादापूर ला संपूर्ण गावाला पिण्याच्या पाण्यासाठी गावाबाहेरील एकच विहिरीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते पण काही महिन्या आधी त्याच विहारी लागत ग्रामपंचायत ने गावकार्यांचा कुठलाही विचार न करता बांधकामासाठी मोठं मोठे खड्डे खोदलेले होते. नंतर गावकाऱ्यांच्या विरोधात मुळे हे खड्डे बुजवण्यात आले परंतु त्यात कुठल्याही प्रकारचे पक्के काम न केल्याने त्यात पावसाळ्याचे तसेच गावातील काही पाणी जमा होऊन तेच पाणी त्या खड्यांच्या साहाय्याने विहरीत जात असल्याने दादापूर ग्रामवासियांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच ग्रामपंचायत या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकारी करीत आहे.गावातील ग्रामपंचायत ही गट ग्रामपंचायत असल्याने सरपंच ही धानोली येथील आहे व त्यांना या बदल फोन द्वारे संपर्क केला असता त्या फोन उचलत नाही असा गावकार्यांचा आरोप आहे.
“मी एक ग्रामपंचायत सदस्य असून मी सुद्धा सरपंच मॅडम यांना या बदल माहिति देण्या साठी फोन केला असता त्या माझा पण फोन उचलत नाही तसेच गावातील समस्याकडे लक्ष देत नाही.”
-दिलीप बोधाने (ग्रामपंचायत सदस्य दादापूर)
“मी या बदल ग्रामपंचायत येथील शिपायला सांगितलं आहे व त्याना त्या पाण्यामध्ये पावडर टाकायला त्यांना सूचना केल्या आहे.”
- सरपंच विद्या खाडे (गट ग्रामपंचायत दादापूर)