- पुरवठा कमी असल्याने दरवाढ
-उत्पादक शेतकऱ्यांचे अन्य पिकांना प्राधान्य - सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड महाराष्ट्राच्या विविध भागांत बहुतांशी लोक जेवणामध्ये तूरडाळीचे वरण, आमटीचाच वापर करतात. त्यामुळे इतर डाळींच्या तुलनेत तूरडाळीला मोठी मागणी आहे. दररोज डाळीचे वरण, आमटी नसेल तर जेवण बेचव समजले जाते. महिन्यापूर्वी तूरडाळ ११०-११५ प्रतिकिलो रुपयांपर्यंत होती, तोपर्यंत हे ठीक होते. मात्र, तूरडाळ १५० रु.वर पोहोचल्याने येत्या दिवसांत तूरडाळीची आमटी, वरण विसरावे लागते की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.यंदा तुरीचा पुरवठा कमी असल्याने बाजारात तूरडाळीचे भाव वाढले आहेत. पुढील नवीन पीक मार्च, एप्रिलमध्ये येणार असल्याने तूरडाळीचे भाव चढेच राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांकडून बांधल्या आहे.
गेल्या महिन्यात तुरडाळीचा भाव किलोमागे ११०-११५ रुपये इतका होता. मात्र, पुरवठादारांकडून मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने दरात जवळजवळ ३० ते ३५ रुपयांनी वाढ होऊन १५० १६० रुपये प्रतिकिलो दर झाला आहे.
आणखी महागण्याची शक्यता
तूरडाळीचे पीक कमी झाल्याने बाजारात मिळणाऱ्या तूरडाळीचा भाव सद्य:स्थितीत १५० ते १६० रुपयांपर्यंत आहे. पुढील काळात सर्वसाधारण १७५, १८०, २०० असा होण्याची शक्यता जाणकार व्यापारी मंडळीकडून व्यक्त होत आहे.
- इतर डाळींचे प्रतिकिलोचे दर
मुंगडाळ १00 ते १४० रुपये मसूरडाळ ८० ते ९० रुपये,हरभरा डाळ ८० ते ९० रुपये तर १२० ते १४५ रुपये उडीद डाळ चे भाव आहे
तूरडाळीचे नवीन पीक मिलकडे येते, तेथून डाळीत रूपांतर केल्यानंतर ती व्यापायांकडे विक्रीसाठी येते. यंदा मात्र तूर पिकाला वातावरणाचा फटका बसला ,नाविलाजाने मिल लवकर बंद करावीलागली त्यामुळे येथील कामगारावर आज उपासमारीची वेड अली .
–सुशीला नामदेव सुरोशे (डाळ मिल संचालिका)
विविध विभागातुन तूरडाळ बाजारात येते. राज्यासह परराज्यातील उत्पादक शेतकयांनी तूरऐवजी अन्य पिकांना प्राधान्य दिले. त्यामुळे मार्चमध्ये येणारी नवीन डाळ बाजारात कमी प्रमाणात आली. पुरवठा कमी असल्याने दरावर परिणाम झाला.
– सतीशदे शमुख , व्यापारी