पवन मनवर
तालुका प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ : जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करीयर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातंर्गत 27 जून रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या रोजगार मेळाव्यासाठी एकूण 96 रिक्त पदे विविध नामांकित कंपन्या हिमालय कार, यवतमाळ, मॅक व्हेईकल प्रा. लि. यवतमाळ, राजवी होंडा, यवतमाळ व मेगाफिड बायोटेक, नागपूर यांच्याकडून उपलब्ध झाली आहेत.या मेळाव्यात 10 वी, 12 वी, आयटिआय, पदविकाधारक, पदवीधर तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी स्वत:चे परिचयपत्र सोबत आणून उपस्थित राहावे. मेळाव्यात उद्योजकांकडून उमेदवारांशी प्रत्यक्ष थेट मुलाखतीव्दारे रिक्तपदांकरीता निवड करण्यात येणार आहे. तरी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.महाराष्ट्र राज्य रोजगार व स्वयंरोजगार विभागातर्फे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय अंतर्गत प्रत्येक महिन्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित केल्या जातात. खाजगी क्षेत्रात व सरकारी विभागात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे या रोजगार मेळाव्याचा उद्देश असतो.