भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी शेवगाव
शेवगाव :-निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ता.शेवगाव जि अहमदनगर या महाविद्यालयात कॉ.आबासाहेब काकडे यांची जयंती उत्साहात पार पडली,सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. कर्मयोगी कॉ.आबासाहेब काकडे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या शैक्षणिक संस्थांचा वटवृक्ष झालेला आहे.कॉ.आबासाहेब यांचा जीवनपट तसेच त्यांची गरजू आणि मागासलेल्या व्यक्तीविषयी असलेली तळमळ यामधून त्यांनी जे जनसेवेचे व्रत हाती घेतलेले होते यामधून त्यांची सामान्य जनतेविषयी असलेले प्रेम व आत्मीयता ही स्पष्ट दिसून येते.कॉ. आबासाहेब हे पेशाने जरी वकील असले तरी त्यांनी वकिली हे अर्थजनाचे साधन म्हणून कधीही बघितले नाही.त्यांनी कायम तळागाळातील लोकांना बरोबर घेऊन सत्तेच्या विरोधात लढा दिला.असे आपल्या भाषणातून कर्मयोगी कॉ. आबासाहेब मांडताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दुकळे पी.ए.हे बोलत होते.कार्यक्रमाचे सुत्रसचालन प्रा.आसने एस.एन.प्रास्ताविक प्रा.गुंड एस.एन. व आभार प्रा.मिरड जे.एम.यांनी मानले.