मारोती सुर्यवंशी
शहर प्रतिनिधी, नरसी
नरसी : मृग नक्षत्रात कसलाच पाऊस झाला नसल्याने शेतकरी अगोदरच विवंचनेत आहे त्यावर बियाणे खरेदीसाठी कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारे सबसिडीचे सोयाबिन महामंडळ ७२६ वर लावण्यात आलेल्या जाचक अटी शिथिल करण्यात येवून ते महामंडळाचे बियाणे शेतकऱ्यांना सातबारावर देण्याची मुभा देण्यात यावी.आशी मागणी निवेदनाद्वारे नांदेड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष संभाजी भिलवंडे यांनी कृषी विभागाचे संचालक जगताप यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.