शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ : नुकतेच यवतमाळ जिल्ह्यात बोगस बि – बियाणे व बोगस खतांची विक्रीकरणाऱ्या वर कृषी विभागाने धाड घालून मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई झालेली आहे .त्यातच तालुक्यातील जेवली व जिल्ह्यातील राळेगाव येथे बोगस बि -बियाण्याच्या साठ्यावर कृषी विभागाने कारवाई केलेली आहे त्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व कृषी केंद्रातील बोगस बि – बियाणे व बोगस खतांची चौकशी प्रशासनाने तात्काळ करावी करिता दि 21 जून रोजी मनसेच्या वतीने उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय येथे निवेदन दिले आहे .
महाराष्ट्र राज्य प्रतिबंधित असलेले बोगस बी- बियाणे, खते, कीटकनाशके, रासायनिक खते इतर राज्यातून आणून सर्रास विक्री करून शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम तालुक्यातील कृषी केंद्रावर सुरू आहे .
या बोगस बियाणे व खतांमुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे त्यामुळे शेतीतील उगम शक्ती कमी होत आहे तसेच बोगस खत व बियाणेमुळे पिकांवर दुष्परिणाम पडून पिकाच्या उत्पन्नात घट होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा जीवन निर्वाह अत्यंत बिकट होत आहे .अगोदरच शेतकरी नापिकी व कर्जपाजारीपणामुळे होरपळलेला असून. आपली जीवन यात्रा संपवत आहे व आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे यास संपूर्णपणे बोगस बियाणे व बोगस खत सुद्धा कारणीभूत ठरलेला आहे.
तर शासनाने निर्बंध असलेले बोगस बी -बियाणे खते कीटकनाशकांचे अवैध विक्री कृषी केंद्राकडून सर्रास सुरू असलेले तालुक्यातील सर्व कृषी केंद्र व त्यांचे वैद्य व अवैध गोदामाची कडक तपासणी करावी तसेच सर्व कृषी केंद्रावरील बिल जीएसटी प्रमाणे ग्राहकांना देण्यास भाग पाडावे व कृषी केंद्रावर भाव फलक लावण्याची सक्ती करण्यात यावी अशा विविध मागण्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय येथे निवेदनातून मागणी केली व रास्ता रोकोचा इशारा दिला .
त्यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष डेविड शहाणे , शहराध्यक्ष संजय बिजोरे पाटील, शहर उपाध्यक्ष संदीप कोकाटे ,मनोज कदम ,अमोल लामटिळे, विशाल कदम, महेश काळबांडे ,अनुराग जोगदंडसह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
चौकट :
जेवली येथे बोगस खताचा साठा सापडून सुद्धा तालुका कृषी अधिकारी कृषी केंद्रावर कोणते निर्बध लावण्यास तयार नाहीत यामध्ये कृपी अधिकार्याने आणि दुकानदार यांचे साठेलोटे दिसुन येते .