मोहन चव्हाण
तालुका प्रतिनिधी परळी वैजनाथ
परळी दि: 23 जून 2023 परळी पासून जवळच असलेल्या सेलू तांडा येथील ऊसतोड कामगाराच्या मुलींची महाराष्ट्रात डंका वाजत असून तीन सख्ख्या बहिणींची महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस म्हणून भरती झाल्या आहेत. त्यांच्या या कर्तुत्वाने परळी तालुक्याची मान उंचावली आहे. तिन्ही बहिणींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. परळी पासून जवळच असलेल्या सेलू तांडा येथील मारुती जाधव हे ऊसतोड कामगार म्हणून सुरुवातीला काम करीत होते. काही वर्षानंतर त्यांनी ऊसतोड मुकादम म्हणून काम करण्यास सुरुवात केली गावात त्यांना जमीन नाही. नाही संपत्ती मारुती जाधव यांना पाच मुली आणि दोन मुले आहेत कुटुंब मोठे असल्यामुळे कष्ट करण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही त्यांनी आपल्या सर्व मुलांना शिक्षण दिले जाधव पती-पत्नी ने सर्व मुलींना शिक्षणासाठी पाठिंबा दिला. आई-वडिलांच्या कष्टाची त्यांच्या मुलींनीही सोने केले मारुती जाधव यांची मोठी मुलगी सोनाली ही कोरोनाच्या काळात पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झाली तर दुसरी शक्ती आणि तिची लहान बहिण लक्ष्मी या नुकत्याच झालेल्या पोलीस भरती मध्ये त्यांची निवड झाली आहे.
तिन्ही बहिणी गेल्या चार वर्षापासून पोलीस भरतीसाठी कसून सराव करीत होत्या व अभ्यास करीत होत्या. एकाच कुटुंबाचे तीन सख्ख्या बहिणी पोलीस दलात सेवेत दाखल होणे ही बहुतेक देशातील पहिलीच घटना जात आहे. सोनाली, शक्ती,लक्ष्मी या सख्या बहिनींनी इतर मुलींना सुद्धा एक प्रेरणा देण्याची काम केले आहे. सावित्रीच्या लेकी शिकल्या तर मोठ्या पदावर पोहोचू शकतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या पोलीस दलातील निवडीचा सेलू तांडा येथील गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत करून आनंद साजरा केला आहे. मारुती जाधव त्यांच्या या तिन्ही सख्ख्या मुलींना परळी तालुक्याची मान महाराष्ट्रात उंचावली आहे दरम्यान इतर मुलींना व महिलांना प्रेरणादायी ठरणाऱ्या जाधव कुटुंबातील या तिन्ही सख्ख्या बहिणींचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.