मुकेश मेश्राम
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या जन्मदिनाचे अवचित्य साधत आरोग्य संकल्प अभियान राबविल्या जात आहे. या अभियाना अंतर्गत 26 जून रोजी भव्य रोग निदान शिबिर, दिव्यांगांना ट्रायसिकल वितरण व रक्तदान शिवीरचे आयोजन करण्यात येत आहे. पंढराबोडी रोड स्थित पेस हॉस्पिटल च्या प्रांगणात सकाळी 9 ते 2 वाजे पर्यन्त आयोजित या शिबिराअंतर्गत सर्व प्रकारच्या रुग्णांची तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी केली जाईल. सोबतच ज्या रुग्णांना शास्त्रक्रियेची गरज आहे अश्या रुग्णाची शस्त्र क्रिया मोफत कण्यात येईल.
पेस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, शासकीय रुग्णालय भंडारा तसेच दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था द्वारा संचालित शालिनि ताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर वानाडोंगरी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन केले गेले असून या करीत नागपूर येथून डॉक्टरांची विशेष चमू येणार आहे. या शिबिरात मेडिसीन तज्ञ, हृदयरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, सर्जरी तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, अस्थी रोग तज्ञ, त्वचा रोग, बळ रोग, कान नाक घसा, श्वसन रोग, मानसिक रोग, न्यूरो सर्जन, दांत व मुख रोग, युरो तज्ञ तथा फिजियो थेरपी तज्ञ हे रुग्णांची तपासणी करून तांच्यावर उपचार करतील. शिबिरात येणाऱ्या ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असेन त्यांच्यावर विविध योजने मार्फत शस्त्रक्रिया केली जाईल. तसेच जे रुग्ण योजनेत येत नाही त्यांच्यावर आयोजका तर्फे निशुल्क शस्त्रक्रिया केली जाईल. इतकेच नाही तर भारती करण्यात येणाऱ्या रुग्णांना राहण्याची व जेवण्याची सोय आयोजका मार्फत निशुल्क करण्यात येणार आहे. या शिबिर दरम्यान जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या विकास निधीतून ट्रायसिकल वितरित करण्यात येणार. या शिबिराचा लाभ घेण्या करीता जिल्ह्यातील रूग्णांनी शिबिर दरम्यान आपली नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.
याच प्रकारे आम. भोंडेकर यांच्या जन्म दिनाचे अवचित्य साधत विधान सभा क्षेत्रा करिता आदर्श नागरि सन्मान पुरस्कार 2023 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विविध क्षेत्रातील विजेते स्पर्धकांना पुरस्कृत करण्या करीता 26 जून ला सायंकाळी 6 वाजता विवाह लॉन येथे पुरस्कार समरोहचे आयोजन करतण्यात येणार आहे. या समारंभात 10वी व 12 वी या वर्गात उच्चांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल. वरील आरोग्य शिवीराचे व संपूर्ण आयोजणाचे लाभ घेण्याचे आवाहन आयोजका द्वारे करण्यात आले आहे.


