अभिजित यमगर
शहर प्रतिनिधी पुणे
पुणे:वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक, लेझीम आणि विठू नामाचा गजर, अशा विठ्ठलमय वातावरणात आज या चिमुकल्यांची शाळा भरली. नामदेव महाराज म्हणतात, माझे कुळींचे दैवत बाप माझा पंढरीनाथ पंढरीस जाऊ चला भेटू रखूमाई विठ्ठला असे काहीसे म्हणत ही चिमुकली मंडळी विठूरायाच्या जयघोषात तल्लीन झाली पोंधवडी तील ज्ञानदिप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी वारीनिम्मित खास चिमुकल्यांची दिंडी काढण्यात आली. यावेळी लेझिमच्या तालावर या चिमुकल्यांनी ताल धरला. ज्याप्रकारे वारकरी देहभान हरपून सोहळ्यात सहभागी होत असतात. अगदी त्याचप्रमाणे ही चिमुकली मंडळीसुद्धा दिंडी सोहळ्यात सहभागी झाली. विठ्ठल रखुमाईची सुबक मूर्ती घेऊन ही चिमुकली मंडळी दिंडीत चालताना दिसली.एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली, केसात गजरा, डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली’ या अभंगाप्रमाणे विठ्ठल भक्तीत वारकरी आवतरले यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला. अन अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले!एकंदरीत काय तर या सगळ्यांनी विठ्ठल हरीनामाच्या जयघोषात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला!



