बंकटी हजारे
तालुका प्रतिनिधी.माजलगाव
राजेगांव:- आपला वाढदिवस चांगल्या प्रकारे कसा साजरा केला जाईल याकडे सध्या ग्रामीण भागातील तरुणात क्रेझ निर्माण झाली आहे. वाढदिवसाच्या दिवशी डीजे लावून नाचणाऱ्यांची संख्या आजकाल कमी नाही. परंतु आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून कार्य करणाऱ्यांची संख्या मात्र मोजकीच आहे.
माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील पवन कचरे या तरुणाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी जिल्हा परिषद वस्ती शाळा राजेगांव येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. वाढदिवसाचा अनाथायिक अनावश्यक खर्च टाळत वस्ती शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना वही पेन दप्तर व इतर शाळा उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून समाजाप्रती एक आदर्श निर्माण केला आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनंत ढोरमारे सर, ढोरमारे मॅडम, पवन कचरे, मा.ग्रा.सदस्य उत्तम साळवे, बाळासाहेब कचरे, विशाल बोचरे, माऊली कचरे, अतुल गिरी, राहुल करचुंडे सह विद्यार्थी व शिक्षण प्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.


