रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा. दिनांक २४/६/२३रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे एमआयडीसी परिसरात संशयास्पद निविष्ठा निर्मिती होत असले बाबत समजले..त्यास अनुसरून तालुकास्तरीय भरारी पथक द्वारे सदर घटनास्थळी तपासणी केली असता सदरचे युनिट हे श्री राहुल सरोदे नामक व्यक्तीचे असून तिथे खत निर्मिती होत असले बाबत समजले.त्यानंतर त्यांना दस्तऐवज मागणी केली असता त्यांना माहिती दिली नाही.त्यानंतर पंच व पोलीस समक्ष पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्यात आली. सदर उत्पादक युनिट चा कुठलाही वैध परवाना नसताना उत्पादन सुरू होते.नामदेव अग्रो अशा नावाने उत्पादन सुरू होते.घटनास्थळी अंदाजे रु ८,०५,९५० रु किमतीचा माल आढळला.सरोदे यांना विचारपूस केली असता आम्ही दोन महिन्यापासून युनिट सुरू केलेलं होते असे विरोधाभासी सांगितले. त्यानंतर ते कुणालाही न सांगता घटनास्थळ वरून निघून गेले. सदर बाब संशयास्पद असल्याने व कोणताही उत्पादक परवाना नसल्याने तेथील खताचे नमुने पांचासमक्ष घेऊन पुढील कार्यवाही साठी पाठवण्यात आले. व विक्रिबंद आदेश देण्यात आला. व त्यानंतर रीतसर एफ आय आर करण्यात आला. पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. सदर कारवाईत तालुका स्तरीय भरारी पथकाचे श्री नरेंद्र राठोड तालुका कृषि अधिकारी तेल्हारा श्री भरतसिंग चव्हाण कृषी अधिकारी पंचायत समिती श्री गौरव राऊत मंडळ कृषी अधिकारी तेल्हारा यांनी केली.


