गोविंद खरात
अंबड शहर,प्रतिनिधी
अंबड : शहरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डी रस्त्यावर शनिवार रात्री 10 वाजेच्या सुमारास दुचाकीवरून किनगाव चौफुलीकडे जाणाऱ्या दुचाकीस्वराला पाठीमागून मोटरसायकल वरून आलेल्या अज्ञाताने गोळीबार करून जखमी करण्याची घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी दोन फायर केले, त्यापैकी एक गोळी राधाकिशन पुंडलिक पिवळ या खाजगी दुकानात नोकरी करणाऱ्या 52 वर्षीय इसमाच्या हाताला लागून तो जखमी झाला. हल्लेखोरानी घटनास्थळावरून पळ काढला असून पोलीस घडलेल्या घटनेचा तपास करत आहेत. अंबड पोलीस स्टेशनचा कारभार प्रभारीराज सुरू असून अंबड शहरात गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. अंबड तालुक्यातील मार्डी जवळील घटनास्थळी सोमवारी सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अंबड पोलीस उपविभागीय अधिकारी मुकुंद आघाव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, प्रशिक्षणार्थी डी वाय एस पी तसेच अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी चैतन्य कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद अहमद, पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण, आदिनाथ ढाकणे, स्कॉट, पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू चव्हाण सतीश देशमुख दीपक देशपांडे वंदन पवार यांनी भेट दिली.याबाबत अधिक माहिती अशी की, वाईन शॉपिवरील मॅनेजर हे अंबड येथून राधाकिसन पिवळ हे एम एच 21 बीबी 70 28 या दुचाकीवरून मार्डी रोड ने जात असताना अंबड कडून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी मोटर सायकल आडवी लावून फिर्यादीच्या ताब्यातील बॅगची मागणी केली.बॅग देण्यास नकार दिल्याने जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ असलेल्या बंदुकीतून गोळी मारून राधाकिसन पिवळ यांना जखमी करून दुचाकीवरून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी राधाकिसन पिवळ यांना औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. राधाकिसन पुंडलिक पिवळ यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात भ.द.वि 307,341,34, कलम 3/25 भारतीय शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद अहमद यांच्याकडे देण्यात आला आहे.घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. तसेच घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. ताबडतोब आरोपीचा शोध घेण्यात येईल.
- रामेश्वर खनाळ (पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना)
घटनास्थळी पोलीस पथकाने भेट दिली असून पोलीस यंत्रणा तपासकामी लागले आहेत. हल्लेखोरांचा हेतूसह अभय बाबींचा तपास करून गुन्हा उघड करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- मुकुंद आघाव (उपविभागीय पोलिस अधिकारी अंबड)


