सय्यद जुल्फेखार अली
ग्रामीण प्रतिनिधी बीड.
बीड: शहरातील जुनेद पठाण हा काही दिवसापासून पोटाच्या दुखण्याने त्रस्त होता.निदान केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की एका किडणीत इन्फेक्शन आहे. आणि ती किडनी काढावी लागेल.जुनेद पठाणने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली असता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जन डॉ माजेद शेख,सर्जन डॉ प्रदीप वाघमारे, भूलतज्ञ डॉ साफे,भूलतज्ञ वाघमारे,डॉ प्रवीण देशमुख,डॉ किरण शिंदे,डॉ जोती केदार, ओटी इन्चार्ज निता लांबोरे व सर्व टीमने अडीच तास शस्त्रक्रिया करून शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली.ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असते .थोडी काही चूक झाली तरी रुग्णाच्या जीवावर बेतू शकते.किडनी काढणे किंवा बसवणे ही मोठ मोठ्या रुग्णालयामध्ये पार पाडली जाते .त्यासाठी फारसा वेळ व पैसा रुग्णांना देऊन त्रास सहन करावा लागतो. परंतु बीड जिल्ह्यातील रुग्ण हे जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांवर विश्वास ठेऊन मोठ मोठ्या आजारावर शस्त्रक्रिया करत आहे.जुनेद पठांनची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर सर्व नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले आहे. तसेच जिल्हा रुग्णालयामधे आणखी सुविधा वाढवून सरकारने बीड जिल्हा आरोग्य विभागाला सर्व सुविधा संपन्न करावे अशी चर्चा नागरिक करीत आहेत.


