सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. २५ जून २०२३ गेल्या काही दिवसांपासून दिवसांपासून दडी मारून बसलेल्या वरून राजाने बीड जिल्ह्यातील काही भागांमध्ये लावली हजेरी बीड जिल्ह्यातील नागरिक आणि बळीराजा जून महिना लागला की वरून राजाची वाट पाहतात.परंतू यावर्षी वरून राजाने दडी मारल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या विवंचनेत पडलेला दिसतो आहे. पावसाने दडी मारल्याने शेतातील मशागतीची कामे करून पेरणी करण्यासाठी वरून राजाची वाट पाहत असलेला बीड जिल्ह्यातील बळीराजाची प्रतीक्षा संपली असून गेल्या दोन ते तीन दिवसांत बीड जिल्ह्यातील वातावरण ढगाळलेले असताना दि. २३ आणि २४ जून रोजी जिल्ह्यातील काही भागांमध्ये वरून राजाने हजेरी लावली तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला.बीडच्या केज तालुक्यातील माळेगाव, सुर्डी, सोनेसांगवी, मांगवडगाव,सुकडी,गोरेगाव, या गावात जवळपास दोन तास मुसळधार पाऊस पडल्याने नदीनाल्यांना पुर आल्याने म्हैस वाहून गेली तर माळेगाव येथील अरूण चंद्रसेन गव्हाणे यांच्या घराजवळील चिंचेच्या झाडाखाली बांधलेली गाय वीज कोसळून दगावल्याची घटना घडली आहे. दोन तीन दिवसात बदलेल्या वातावरणामुळे उष्णता कमी झाल्याने उन्हामुळे होणारा उकाडा आणि त्रास कमी झाला आहे. बीड जिल्ह्यात वरून राजाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावल्याचे दिसते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)