कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
आज दिनांक २५ जुन रोजी सोनाळा येथील वारकऱ्यांचे पंढरपूर कडे प्रस्थान होत आहे.सर्व वारकरी आनंदमयी व भक्तिमय वातावरणात विठ्ठलाचा नामगजर करत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे निघाले आहे.श्री संत सोनाजी महाराज संस्थानची पालखी पंढरपूरला पोहोचली असून राहिलेले वारकरी आज प्रस्थान करत आहेत.कधी एकदा पांडुरंगाचे दर्शन होते हीच आस सर्वांना लागली आहे


