कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद .जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना बाहयक्षेत्रातील आदिवासी लाभार्थ्यांना जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनांतर्गत पारधी विकास योजनेतून तसेच नाविण्यपूर्ण योजनेतून आदिवासी लाभार्थ्यांना विविध वस्तूंची व धनादेशचे वाटप मा.संजय राठोड मंत्री अन्न व औषध प्रशासन तथा पालकमंत्री यवतमाळ यांच्या हस्ते शासकीय विश्रमगृह नेर येथील दिनांक २२/०६/२०२३ रोजी करण्यात आले.
ज्या पारधी लाभार्थ्यांच्या घरी विदयूत व्यवस्था नाही अशा अंजती पारधी वेडयावरील पारधी लाभार्थ्यांना सौर कंदीलाचे वाटप करण्यात आले तसेच झोबाडी वेडयावरील ०२ पारधी लाभार्थ्यांना दुधाळ जनावराचे प्रत्येकी रु.९०.००० च्या धनादेश चे वाटप करण्यात आले कोलाम या आदिम जमतीतील लाभार्थ्यांना सकस आहार व ताजा भाजीपाला मिळण्याच्या उददेशाने नाविण्यपूर्ण योजनेतून महाबीज परसबाग भाजीपाला बियाणे किटचे वितरण नेर तालुक्यात उत्तरवाढोनणा व कामनदेव येथील लाभार्थ्यांना किटचे वाटप करण्यात आले. सादरची योजना प्रकल्प अधिकारी एकत्मिक विकास प्रकल्प. पुसद जिल्हा यवतमाळ यांचे मोफत राबविण्यात आली असून आदिवासी लाभार्थ्यांना प्रकल्प कार्यालयाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा व आपले जीवनमान उंचवावे असे आवाहन मा. संजय राठोड मंत्री अन्न व औषध प्रशासन तथा पालकमंत्री यवतमाळ यांनी केले यावेळी मा .आत्माराम धाबे .प्रकल्प अधिकारी एकत्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद जि. यवतमाळ मा.मगर. तहसीलदार .नेर . शिंदे. गट विकास अधिकारी. पंचायत समिती नेर तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी लाभार्थी मोठ्या संख्येने हजर होते तसेच कार्यक्रमाचे आभार. प्रदर्शन एस बी पाईकराव. गृहपाल यांनी केला


