विठ्ठल मोहनकर
तालुका प्रतिनिधी हिंगोली
कनेरगाव नाका : जि.प.माध्यमिक शाळेतील दहावी व बारावीत विशेष गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मनोहर मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी मुटकुळे होते.यावेळी आरती पवार, प्रतीमा गावंडे ,रितीका पवार , प्रथमेश बनसोडे,प्रितम सावंत,दिशा टोंचर,गायञी घेवारे या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित रामचंद्र गावंडे, विकास पठाडे, वैभव जुनघरे, राजु गावंडे,शाळा समिती अध्यक्ष पंकज पोखरे, अंकुश पवार, सर कोंघे सर, वानखेडे सर, पालक व विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.