चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी,अकोट
अकोट : भारतीय जेसीस ची आंतरराष्ट्रीय शाखा असलेले जेसीआय आकोटचा ४३ वा पदग्रहण सोहळा नुकताच झुनझुनवाला अतिथी गृह येथे पार पडला. यावेळेस मंचावर मुख्य अतिथी म्हणून अकोला येथील सुप्रसिध्द अस्थी रोग तज्ञ डॉ. अभयजी पाटील, अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाशीजी अहिरे तर विशेष अतिथी म्हणून जेसीआय इंडिया झोन १३ चे झोन प्रेसिडेन्ट जेसी जितेंद्रजी बोरा, ZVP जेसी डॉ. कुशलजी झवर, पास्ट प्रेसिडेन्ट फोरमचे जेसी दिलीपजी हरणे, झोन १३ चे एसएमए व्हाईस चेअरमन जेसी दिलीपजी चावडा, झोन ऑफिसर जेसी नितीनजी शेगोकार, २०२२ चे अध्याय अध्यक्ष जेसी अतुलजी भिरडे, सचिव जेसी शिरजी घाटोळ, ज्यु. जेसी चेअरपर्सन आकांक्षा पांडे, जेसीलेट विंग जेअरपर्सन स्वरीत वासे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमादम्यान मावळते अध्यक्ष जेसी अतुलजी भिरडे यांनी त्यांनी केलेल्या कार्याचा अहवाल सादर करून नुतन अध्यक्ष जेसी प्रविण बनसोड यांना कॉलर, गॅव्हल व पिन प्रदान करून पदभार हस्तांतरित केला व अध्यक्ष पदाची शपथ दिली.
नुतन अध्यक्ष जेसी प्रविण बनसोड यांनी सचिव २०२३ जेसी अभिषेक दुबे, उपाध्यक्ष जेसी विनोदजी कडू,जेसी प्रसाद देशपांडे, जेसी संदिप चांडक, जेसी अमोल टावरी, जेसी प्रज्ञा घाटोळ, संचालक भरत कोथळकर, जेसी शिरीष घाटोळ, जेसी विवेक गणोरकार, जेसी अमित ठाकूर, जेसी गौरांग व्यवहारे, कोषाध्यक्ष जेसी प्रशांत पिंपळे,सहकोषाध्यक्ष जेसी डॉ. कुष्णन बजाज, महिला समुह अध्यक्ष जेसी डॉ. सोनल व्यवहारे, समन्वयक जेसी सागर बोरोडे, जेसी विकास चावडा, जेसी आनंद लखोटिया, चेअरपर्सन युथविंग ओम हाडोळे, चेअरपर्सन युथविंग लक्ष टावरी तसेच स्पेशल ऑफिसर जेसी दिपक वर्मा, जेसी हरी सेजपाल, जेसी भरत वासे, जेसी भुषण नेमाडे, जेसी योगेश कुबडे, जेसी संदिप भुस्कट, जेसी विजय नवले, जेसी अमर राठी, जेसी रूद्रम झाडे, जेसी डॉ. अक्षय बोरोडे, जेसी भगवान लांडगे, राजेंद्र मुऱ्हेकार, जेसी किशारे लहाने, जेसी अयज अडोकार, जेसी अरविंद मोडक, जेसी चेतन उपासे, जेसी राजेश भंडारी संपादक देवानंद झाडे, सहसंपादक सुमित पवार, राहुल शेगोकार यांना पदाची शपथ देवुन पदभार सोपविला. तसेच तसेच या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्र संचालन जेसी प्रज्ञा घाटोळ व जेसी प्रसाद देशपांडे यांनी केले. तसेच पुरस्कार वितरणाचे संचालन जेसी संदिपजी चांडक व जेसीरेट स्वाती वासे,जेसी सागर बोरोडे व जेसीरेट मंगला गणोरकार यांनी केले. अध्यक्षाचा परिचय आपल्या अनोख्या शैलीमध्ये पुर्वाध्यक्ष जेसी गोपालजी गांधी यांनी दिला.
या कार्यक्रमाकरीता जेसीआय अकोटचे पुर्वाध्यक्ष जेसी विद्याधरजी कोठीकर, जेसी दिलीपजी चावडा,जेसी दिलीपजी हरणे, जेसी मिलींदजी झाडे, जेसी रत्नाकरजी मिरकुटे, जेसी अरविंदजी लहाने, जेसी संजयजी पवार, जेसी सुनिलजी पांडे, जेसी नंदकिशोरजी शेगोकार, जेसी जितेंद्रजी चावडा, जेसी आनंदजी भोरे, जेसी गोपालजी गांधी, जेसी मधुसुदनजी व्यवहारे, जेसी आनंदजी बाळे, जेसी नितीनजी झाडे, जेसी ओमजी राठी, जेसी अशोकजी गट्टाणी जेसी बिपीनजी टावरी, जेसी प्रशांतजी खोडके, जेसी निलेशजी हाडोळे यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच नुतन सभासद जेसी चेतन पटके, जेसी अनिल सुलताने, जेसी अनिल सुलताने, जेसी. ॲङ सचिन खलोकार, जेसी हर्षल वर्मा, जेसी हिमांशु अग्रवाल, जेसी रोहित शेगोकार, जेसी सुशिल सावरकार, जेसी प्रवण वागलकार,जेसी डॉ. भावेश सिरसाट, जेसी डॉ. विशु विल्यम, जेसी गौरव खलोकार, जेसी ऋषिकेश काळे, जेसी मंनोज चांडक, जेसी सागर निचळ, जेसी सागर अंबळकार, जेसी डॉ. अमर काळे सदस्यत्वाची शपथ घेतली.
या कार्यक्रमासाठी जेसी व जेसीरेट विंगचे सहकार्य लाभले. आभार प्रदर्शन सचिव जेसी अभिषेक दुबे यांनी केले. अशी माहिती जेसीआय आकोट जन संपर्क अधिकारी जेसी भारत वासे कळवितात.