पुणे : राज्यात सद्य:स्थितीत 180 साखर कारखान्यांकडून ऊसगाळप जोमाने सुरू असून, आतापर्यंत 250 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झालेले आहे. ऊसगाळपात सोलापूर विभागाने आघाडी घेतली असून, साखर उत्पादन आणि उतार्यात कोल्हापूर विभागाचे अग्रस्थान कायम आहे. परवाने घेतलेले उर्वरित साखर कारखानेही सुरू झाल्यास ऊसगाळपाचा वेग आणखी वाढण्याची अपेक्षा साखर सहसंचालक (विकास) पांडुरंग शेळके यांनी व्यक्त केला. राज्यात चालू वर्ष 2022-23 सुमारे 1 हजार 343 लाख टन इतके ऊसगाळप अपेक्षित आहे. त्यापैकी 18 टक्के ऊसगाळप पूर्ण झालेले आहे. तसेच, राज्यात 2 कोटी 19 लाख 52 हजार क्विंटल इतके साखरेचे उत्पादन तयार झाले असून, साखरेचा सरासरी उतारा वाढून 8.78 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामध्ये यापुढे वाढ होत जाण्याची अपेक्षा आहे.