अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर – आस्टूल : जागतिक (दिव्यांग) अपंग दिन दरवर्षी डिसेंबर महिण्यामध्ये 3 डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. समाजाला या आपल्या कर्तव्याची आणि अपंग व्यक्तींच्या हक्काची आठवण करून देणारा हा दिवस होय. आपण जे करू शकतो ते सर्व काही दिव्यांग बांधव देखील करू शकतात. म्हणूनच त्यानां सहानुभूती नाही तर आपुलकीची गरज आहे.दिव्यांग दिनानिमित्त 03/12/2022 रोजी प्रहार बहुउद्देशीय संस्था,आस्टूल संस्थापक अध्यक्ष अमोल करवते यांनी दिव्यांग बांधवांना मिठाई व पुष्पगुच्छ देऊन साजरा करण्यात आला.यावेळी पवन तांबे, प्रवीण गवई, संतोष इंगळे,कर्तबदार दिव्यांगाचा सत्कार करण्यात आला.यावेळी जेष्ठ पत्रकार देवानंद गहिले, युवा सामाजिक कार्यकर्ते आकाश हिवराळे, गजानन फुलारी, निलेश हिवराळे,देवा दशवंतराव आदी उपस्थित होते.


