नाशिक : पेठ येथील बस डेपो नजिकच्या परिसरात एक नवजात बालक बेवारस स्थितीत आढळून आले. बस डेपो परिसरात दुपारी दोन वाजेच्या सुमारास काही कर्मचाऱ्यांना झुडूपामध्ये हे नवजात बालक दिसले. पेठ येथील चेतन खेकाळे, गणेश वाडकर व इतर तरुणांनी या बालकास तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिका-यांनी बाळाची तपासणी करून प्रकृती ठीक असल्याचे सांगितले. हे बाळ स्री जातीचे असून २ किलो १०० ग्रॅम वजनाचे आहे. या बाळाची प्रसुती ही इस्पितळात झाली असावी अशी शक्यता जाणकारांनी वर्तवली. अशा गोंडस नवजात बालकाला बेवारस स्थितीत सोडल्याने पाहणाऱ्या अनेकांनी हळहळ व्यक्त केली.


