अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : दि – 03/12/2022 रोजी पातूर पोलीस स्टेशन येथील कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष उपनिरीक्षक सामाजिक बांधिलकी जोपासणारे, मनमिळाऊ स्वभाव असणारे, निर्मळ अस व्यक्तिमत्व, युवकांचे प्रेरणास्थान मा. हर्षल रत्नपारखी यांचा वाढदिवस द प्रोफेशनल करिअर अकॅडमी पातूर व राजबोधी बहूउद्देशीय संस्था तथा पातूर पोलीस स्टेशन युवा समिती यांच्या वतीने पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन साजरा करण्यात आला.यावेळी पातूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष उपनिरीक्षक मा.हर्षल रत्नपारखी बोलतांना म्हणाले की,मानवी जीवन जगणे खूप कठीण आहे.आपल्याला चांगले विचार आणि चांगल्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत. तसेच युवकांनी सुद्धा धावपळीच्या युगामध्ये मेहनत, जिद्द व चिकाटीने समोर जाणे गरजेचे आहे.यावेळी द प्रोफेशनल करिअर अकॅडमीचे सहसचिव अविनाश पोहरे, राजबोधी बहूद्देशिय संस्थेचे संस्थाध्यक्ष निखिल उपर्वट, युवा पत्रकार किरणकुमार निमकंडे, निखिल इंगळे, राजेश देशमुख,अक्षय गाडगे, पवन सुरवाडे, रवि चव्हाण आदी उपस्थित होते.

