पिंपरी : बनावट ईमेलद्वारे कंपनीला परदेशातील कंपनीचे बँक खाते बदलले असल्याचे सांगून 37 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 17 ते 29 नोव्हेंबर 2022 या कालावधीत बाणेर येथे घडली. सुनील भाऊ एरणकर (35, रा. बाणेर, पुणे) यांनी बुधवारी (दि. 30) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात ईमेल धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने बनावट मेल आयडीवरून फिर्यादी यांचे कंपनीचे ईमेल आयडीवर कंपनीचे बँक खाते बदलले असल्याचा इमेल केला. तसेच, नवीन बँकेत खाते उघडले असून, त्याचा क्रमांक सांगून पुढील आर्थिक व्यवहार कंपनीच्या या खात्यावर करण्यास सांगितले. त्यानुसार, फिर्यादी यांनी पुढील व्यवहारापोटी देणे असलेले रुपये 37 लाख 75 हजार रक्कम पाठवली. दरम्यान, समोरच्या कंपनीने पैसे मिळाले नसल्याचे सांगितल्यानंतर फिर्यादी यांना आपल्या कंपनीची फसवणूक झाल्याचे लक्षात आहे.


