पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील शाळांमध्ये स्नेहसंमेलन आणि वार्षिक क्रीडा महोत्सवाची तयारी सुरू असल्याने सध्या शहरातील चारही नाट्यगृहांमध्ये स्नेहसंमेलनांसाठी तारखा फुल झाल्या आहेत. त्यानिमित्ताने नाट्यगृहांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. सध्या सर्रास शाळांची स्नेहसंमेलने ही नाट्यगृहांमध्ये घेतली जातात. नाट्यगृहांमध्ये तासानुसार भाडे आकराले जाते. यामध्ये काही शाळा तर संपूर्ण दिवसासाठी नाट्यगृहाचे बुकिंग करतात. शाळांमधून फक्त हुशार विद्यार्थीच घडत नसतात, तर काही कलाकार आणि खेळाडूदेखील घडत असतात. अशा स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलेला वावदेखील मिळत असतो. स्नेहसंमेलनातील गायन, नृत्य, नाटिका स्पर्धा आयोजित केल्या जातात.
शहरामध्ये चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिर, भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, पिंपळे गुरव येथील नटसम—ाट निळू फुले रंगमंदिर या ठिकाणी डिसेंबर ते फेब—ुवारी दरम्यान नाटकांच्या तारखांचे बुकिंग झाले आहे. तर, मार्च महिन्यातील तारखांचे बुकिंग सुरू आहे. स्नेहसंमेलनासाठी लागणार्या वेशभूषेसाठी सध्या ड्रेसच्या दुकांनामध्ये पालकांच्या रांगा लागल्या आहेत. महापुरुषांची, पौराणिक काळातील, ऐतिहासिक काळातील वेशभूषांना मागणी असते. तसेस, ग्रुप डान्ससाठी घागरा, नऊवारीसाडी, ज्वेलरीलादेखील मागणी आहे. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये नाटकांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. पण सध्या शनिवार व रविवारी नाटक आणि इतर दिवस हे स्नेहसंमेलनासाठी बुक झाले आहेत. भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह लांब असल्यामुळे ऐरवी जास्त कार्यक्रमांचा प्रतिसाद नसतो. मात्र, याठिकाणी जवळपास शंभर ते दीडशे शाळांच्या स्नेहसंमेलनाचे बुकिंग झाले आहे. त्यामुळे ऐरवी महिन्याभरात लाखाच्या आत असणारे उत्पन्न आता 35 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.