भुसावळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने १४ अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तीन स्पेशल गाड्या नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, सहा स्पेशल गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर, दोन स्पेशल गाड्या कलबुर्गी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईदरम्यान दोन स्पेशल गाड्या धावतील. सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि एक विशेष गाडी अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत धावेल. या विशेष गाड्या दि. ४, ५ व ६ डिसेंबरला साेडण्यात येणार आहे. विशेष गाडी क्रमांक ०१२६२ नागपूरहून ४ डिसेंबरला रात्री ११.५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक ०१२६४ ही गाडी दि. ५ डिसेंबरला सकाळी ८ वाजता नागपूरहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल. याशिवाय इतर गाड्याही असतील.


