कु.चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी अकोट
अकोट : शहरातील हिवरखेड रोडवर असलेल्या श्रीराम कॉटस्पिंन फॅक्टरीच्या भव्य सभागृहात विदर्भातील सुप्रसिद्ध भजन गायक श्री चंद्रकांत जी तिवारी यांच्या सुमधुर वाणीतून श्री खाटू बाबा भजन संध्या संपन्न झाली. अकोट येथील सुप्रसिद्ध व्यापारी विशाल गुप्ता व नितीन गुप्ता परिवाराद्वारा श्रीराम कॉटस्पिन येथे आयोजित भजन संधेत विदर्भातील सुप्रसिद्ध भजन गायक चंद्रकांत जी तिवारी त्यांच्या सुमधुर वाणीतून श्री खाटू श्याम भजनाने मंत्रमुग्ध होऊन आपण राजस्थान येथील खाटू नगरीत पोहोचल्याचे भक्तगणांना वाटत होते.
सदरहू भजन संधेत दर्जी सील दे निसान मने खाटू जानू से , पलको का घर तयार सावरे ,विठ्ठल विठ्ठल विठ्ठला , खम्मा खम्मा, आधी चंद्रकांत तिवारी यांच्या स्वरचित भजनांवर भक्तगणांनी थिरकण्याचा आनंद लुटला. शेकडों भक्तगणांच्या उपस्थितीत प्रथमताच आकोट नगरीत एवढ्या भव्य प्रमाणात श्री खाटू श्याम बाबा भजन संध्या संपन्न झाल्याचे चित्र निदर्शनास आले. भजन संध्या चा समारोप श्री खाटू श्याम बाबा च्या आरतीने करण्यात आला. त्यानंतर उपस्थित सर्व भक्त गणांनी भोजनाचा आस्वाद घेतला.


