दिनेश शर्मा
शहर प्रतिनिधी बुलढाणा
बुलढाणा : शहर वृत्तपत्र विक्रेते विक्रेता संघटनेची कार्यकारिणी ५ सप्टेंबर रोजी गठित करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी समीर शिंदे, उपाध्यक्षपदी राजू सपकाळ तर सचिवपदी योगेश अढाव यांचे एकमताने निवड झाली. समिती सदस्यपदी राहुल डोळकर, प्रवीण पवार, यादव हाके, संजय जैन यांची निवड करण्यात आली. शासकीय विश्रामगृह बुलढाणा येथे संघटनेचे विशेष बैठक सोमवारी संपन्न झाली. या सभेत निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सदस्य ज्ञानेश्वर इंगळे हे होते. तसेच बुलढाणा येथील एजंट गोविंद तायडे, माधव देशमुख व राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली. प्रास्ताविक राजेंद्र टिकार यांनी केले. यावेळी बुलढाणा शहरातील वृत्तपत्र विक्रेते सुमित चिंचोळकर, वैभव वाघमारे, उमेश देशमुख, अतुल देशमुख हे उपस्थित होते. आभार माधव देशमुख यांनी मानले.











