कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : आर्य वैश्य समाज पुसद गणेशोत्सव 8/9/2022 रोजी व्यापारी योग भवन डुब्बेवार ले आऊट पुसद येथे यशवंत नागरिक व गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला . मानव विकास संरक्षण समिती नवी दिल्ली रजि. संस्थापक – राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय कुराडे साहेब यांचे आदेशावरून व कोअर कमिटी सल्लागार श्री. भाऊसाहेब शिंदे साहेब यांनी केलेल्या शिफारस वरून राष्ट्रीय मानव संसाधन व्यवस्थापन-प्रशासक श्री. प्रविण गायकवाड साहेब यांचे अनुमतीने यवतमाळ जिल्हा- उपाध्यक्ष निवड करण्यात आली आहे. श्री. विवेक दत्तात्रय मन्नरवार यांची मानव विकास संरक्षण समिती यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माझा गौरव चिन्ह गौरव पत्र व पुष्पगुच्छ देऊन आर्य वैश्य समाजाचे कार्याध्यक्ष श्री सूरज भाऊ डुबेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष-मा. डॉ.श्री. उत्तम रुद्रवार सर पुसद प्रमुख पाहुणे-मा. श्री.संजय भाऊ चिद्दरवार आर्य वैश्य समाज अध्यक्ष ऍड उमाकांत पापीनवार आर्य वैश्य समाज स्वागताध्यक्ष श्री दीपक आसेगावंकर आर्य वैश्य समाज महिला अध्यक्षा सौ. सीमा पापीनवार आर्य वैश्य समाज भवनचे अध्यक्ष डॉ सुधीर झीलपीलवारआर्य वैश्य समाज गणेशोत्सव समिती अध्यक्ष अमेय जिल्हेवार तसेस आर्य वैश्य समाजाचे सर्व पदाधिकारी व सदस्य आर्य वैश्य समाजा भवनाचे सर्व पदाधिकारी व सदस्य गणेशोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य आणि पुसद शहरातील सर्व समाज बांधव उपस्थित होते.