जितेंद्र लाखोटीया
ग्रामीण प्रतिनिधी, तेल्हारा
(तेल्हारा) हिवरखेड : येथील सदाशीव सस्थान येथे गांधी स्मारक व कृष्ण मंदिराचे मधातील रिकामे जागेत महादेव मंदीराचे भूमीपुजन वारी हनुमान संस्थांचे महंत कृष्णभारती महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. सनातन कालपासून वडाचे झाडाखाली नदी काठवर सदाशिव मंदीर असून नवीन ठिकानी म्हणजे दत्त मंदीर व कृष्ण मंदीरा जवळ निर्माण करण्यासाठी तसेच पुढेही भवीष्यात हनुमंताचे मंदिर सुद्धा काठावरुन पुढे दक्षिनेकडे नवीन ठिकानी बांधण्याचे विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले. तसेच सालाबाद प्रमाने गणेश मूर्ती व निर्माल्य यांचे योग्य ठीकानी विसर्जण व्हावे यासाठी वारी येथील हनूमान मंदीराचे महंत कृष्णभारती महाराज याचे हस्ते गणेशघाट तलाव भूमीपुजन मंहत कृष्णभारती महाराज यांचे हस्ते करण्यात आले.
प्रमुख उपस्थित सरंपच रमेश दुंतोडे, ग्रा.प.सदस्य मंगेश ताळे, कीरण सेदानी, मनीष भूडके, वारी मंदीराचे सेवाधारी श्री पोहरे, दंत्तमंदीर ट्रस्टी देवेंद्र राऊत, जितु लाखोटीया, संजय देशमूख, संजय हिवराळे, सुरज चौबे, बंजरगी हागे, सूमीत ढबाले, गणेश वानखडे, भाजयूमो चे रवी मानकर, सूदाम राऊत, बाळासाहेब नेरकर यांची उपस्थिती होती. तसेच घरगूती गणेशमूर्ती व लहान मूर्ती असलेल्या मंडळांनी या सदाशिव सस्थानवर ग्रामपंचायत कडून बांधलेल्या घाटावर गणेश मूर्तीचे विसर्जण करावे किवां विसर्जन दिनी ग्रामपचांयतच्या ट्रक्टर मधे मूर्ती विसर्जनासाठी भक्तानी द्याव्या असे आवाहन गणेश भक्तांना सरपंच रमेश दुतोंडे व सर्व ग्रा.पं. सदस्य हिवरखेड व पोलीस स्टेशन हिवरखेड कडून करण्यात आले.