संजय पराडके
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
नंदुरबार : राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.गुरुवार 8 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 8.23 वाजता रेल्वेने नंदुरबार येथे आगमन व शासकीय वाहनाने निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 8.40 वाजता निवासस्थानी आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता अभ्यागतांच्या भेटीसाठी व स्थानिक कार्यक्रमांसाठी राखीव. (मुक्काम- 6, विरल विहार, खोडाईमाता रोड, नंदुरबार.).शुक्रवार 9 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता अभ्यागतांच्या भेटीसाठी व स्थानिक कार्यक्रमांसाठी राखीव. (मुक्काम- 6, विरल विहार, खोडाईमाता रोड, नंदुरबार.). शनिवार 10 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता नंदुरबार येथून शासकीय वाहनाने उंबरफाटा ता.साक्री जि.धुळे कडे प्रयाण. सकाळी 11 वाजता उंबरफाटा ता.साक्री येथे आगमन व 33/11 के.व्ही च्या सिंगल फेसिंग लाईटच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ :उंबरफाटा ता.साक्री जि.धुळे )दुपारी 12.30 वाजता उंबरफाटा ता.साक्री येथून शासकीय वाहनाने नंदुरबारकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता नंदुरबार येथे आगमन व राखीव. दुपारी 3.33 वाजता नंदुरबार येथून शासकीय वाहनाने सुरतकडे प्रयाण.