महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : शहरातील भोजवार्ड येथील सुयोग गणेश मंडळाला चाळीस वर्षाची उज्वल परंपरा असुन हे मंडळ शहरातील सर्वात जुने व मोठे गणेश मंडळ आहे. यावर्षी या मंडळातर्फे सात फुट ऊंचिच्या आकर्षक अशा श्रीगणेशाच्या मुर्तिची स्थापना करण्यात आली आहे. या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी शहरातील भाविक गर्दी करीत आहे. कोणत्याही आर्थीक वर्गणी न मागता हे मंडळ दरवर्षी आपला गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतात हे या मंडळाचे वैशिष्ट आहे. हा गणपती शहरातील मानाचा गणपती म्हणुन ओळखल्या जातो.या मंडळाचे सदस्य केवळ वार्डापुरतेच मर्यादित नसुन संपुर्ण भद्रावती शहरात पसरले आहे. हा गणपती नवसाला पावतो अशी ख्याती आहे. त्यामुळे या गणपतीच्या दर्शनासाठी भाविक आवर्जून येत असतात.मंडळाचे अनेक सदस्य नोकरी तथा व्यवसायात आहेत हे सर्व आपल्याला या गणेशाच्या आशिर्वादामुळेच असल्याची त्यांची भावना असल्यामुळे हे सर्व सदस्य आपल्या आर्थिक ऐपतीप्रमाणे या ऊत्सवाची भार उचलत असल्यामुळे व अनेक भाविक आपल्या ईच्छेने आर्थिक मदत करीत असल्याने हा गणेशोत्सव कोणत्याही आर्थिक विवंचनेशिवाय दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. मंडळातर्फे येथे मोठ्या महाप्रसादाचेही आयोजन केल्या जाते याचा लाभ शहरातील भाविक घेत असतात.गणेशोत्सवाच्या दरम्यान व विशेषता गणेश विसर्जनाच्या दिवशी या मंडळाचे कामानिमित्य इतर गावात असलेले मंडळाचे सदस्य आवर्जुन येथे येत असतात मंडळाचे अभिजीत नारळे, संतोष आष्टुनकर, नितीन कवासे,सुरेश डाखरे,उमेश अलोणे,सागर कालेजवार, संदिप स्वान,दिलीप पतरंगे,अशोक स्वान,निखील आष्टुनकर,कुणाल पतरंगे, सुधीर जवळे तथा अन्य सदस्य यावर्षीच्या गणेशोत्सवाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहे.