ज्ञानेश्वर कापसे
शहर प्रतिनिधी पुणे
पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून प्रस्तावित असलेल्या पुणे शहराभोवतीच्या वर्तुळाकार ( रिंगरोड ) रस्त्यासाठी एकूण 1 हजार 740 हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे . यात मावळमील अकरा गावे बाधित होणार आहेत . पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून 172 कि . मी . लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा रिंगरोड असणार आहे . त्यात सर्वाधिक 1 हजार 601 हेक्टर क्षेत्र हे खासगी व्यक्तींचे आहे . पूर्व भागात मावळ तालुक्यातील 11 गावे , खेडमधील 12 गावे , हवेलीतील 15 , पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे , तर पश्चिम भागात देखील अनेक गावांचा समावेश आहे .. मावळ , मुळशी , खेड , हवेली , पुरंदर आणि भोर या तालुक्यांमधून हा रिंगरोड प्रस्तावित आहे .