महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत शिक्षण विभागामार्फत दरवर्षी प्रत्येक तालुक्यातील एका शिक्षकाची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली जाते.या वर्षी भद्रावती तालुक्यातील पंचायत समिती भद्रावती अंतर्गत भद्रावती येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ. मेघा बंडूजी शेंडे यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेवून त्यांची या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. जिल्हा परिषद चंद्रपूर येथील कन्नमवार सभागृहात उद्या दिनांक पाच सप्टेंबर ला शिक्षक दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.मेघा सेंडे ह्या विदर्भ साहित्य संघ भद्रावतीच्या सदस्या आहेत . आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाल्यामुळे सौ मेघा सेंडे यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे. आपण आपल्या कारकीर्दीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले त्याची दखल शिक्षण विभागाने घेऊन आपल्याला हा पुरस्कार बहाल जात आहे, याचा खऱ्या अर्थाने आनंद आहे. असे सौ.मेघा सेंडे यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केले.त्यांना हा पुरस्कार मिळाल्या मुळे संताजी स्नेही मंडळ भद्रावती ,योग समिती भद्रावती, विदर्भ साहित्य संघ शाखा भद्रावती यांच्यावतीनेे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.या प्रसंगी डॉ. सुधिर मोते, डॉ. ज्ञानेश हटवार, प्रविन आडेकर, विनोद बाळेकळमकर, अनिल पिट्टलवार, किशोर गाठे, आदी मान्यवर उपस्थित होते.


