कु.चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी अकोट
अकोट : शहरातील अन्सार कॉम्प्लेक्स जवळ इफ्तेखार प्लॉट भागात गोमांस विक्री करणाऱ्या आरोपीच्या विरोधात शहर पोलिसांनी कारवाई केली.त्याच्याकडून १६७५०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. रविवारी शेख अशपाक शेख रहीम वय ४२ वर्ष रा.अकबरी प्लॉट,रहमानिया मजिद जवळ अकोट याच्या विरुद्ध पोलिस अंमलदार उमेश पराये यांनी शहर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. आरोपीकडे गोवंश जातीचे जनावरांचे मास (बैल) ८० किलो किंमत १६०००,कत्तलकरिता लागणारे साहित्य एक सुरा किंमत १०० रु,एक लाकडी ठोकळा किंमत ५० रु,एक वजन काटा किंमत ३०० रु,एक ५०० ग्रॅम वजन गोटा किंमत १०० रु,एक कुऱ्हाड किंमत २०० रु, असा एकूण १६७५०/-रुपयाचा माल जप्त करण्यात आले.सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी रितू खोखर, शहर पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनात पोउपनि राजेश जवरे,पोहेका.उमेशचंद्र सोळंके,उमेश पराये,नापोका.विजय चव्हाण, मनीष कुलट, सागर मोरे यांनी कारवाई केली.