ज्ञानेश्वर कापसे
शहर प्रतिनिधी पुणे
पुणे : कात्रज घाट परिसरातील भिलारेवाडी वनविभागात गेल्या पंधरा दिवसांत चार वेळा बिबट्याचे दर्शन झाल्याने यावेळी बिबट्याचा मुक्काम वाढल्याचे दिसत आहे परिणामी , घाट रस्त्याने प्रवास करणारे दुचाकीस्वार व लगतच्या नागरी वस्तीतील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे . भिलारेवाडी वन विभाग ७५० हेक्टर क्षेत्रावर विभागाला आहे . उंच डोंगर , विस्तीर्ण झाडी , पाझर तलाव यामुळे वन्यजीवांचा अधिवास आहे . मोर , माकड , रान डुक्कर , ससे अशा वन्यजीवांसह बिबट्याचे वास्तव्य आढळून येते . अनेक वेळा बिबटे व बछडे पाहायला मिळाले आहेत . वन विभागालगत भिलारेवाडी , गुजर निंबाळकरवाडी भागात नागरी वस्ती झपाट्याने वाढली आहे , तसेच नाही . कात्रज घाटात आढळलेला बिबट्या . अनेक शेतकरी , शेतमजूर व नागरिकांची या भागात भटकंती असते . यापूर्वी गाई , वासरे व पाळीव कुत्र्यांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत . त्यामुळे नागरिकांतून भीती व्यक्त होत आहे . भिलारेवाडी वनक्षेत्र मोठे असून , वन विभागातील वरिष्ठांचे नेहमीच दुर्लक्ष होते . बिबट्यावर लक्ष ठेवून खासगी जागेत दिसताक्षणी जेरबंद करावे , अशी मागणी नागरिकांतून वारंवार होत आहे . या संदर्भात रेंजर फॉरेस्ट ऑफिसर सणस यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही .