वृषभ दरोडे
तालुका प्रतिनीधी राळेगाव
राळेगाव : तालुक्यात येत असलेल्या धानोरा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा धानोरा येथे अमृत महोत्सवी स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने आज स्वतंत्र दिनाचा सोहळा मोठ्या दिमाखदार वातावरणात पार पडला. शाळेत ध्वजारोहण हे शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष यांच्या हस्ते पार पडत असते परंतू शाळा व्यवस्थापन समिती धानोरा चे अध्यक्ष संजय कारवटकर यांनी ध्वजारोहणाचा मान जि .प .शाळेची माजी विद्यार्थीनी कु.वैष्णवी प्रदीप गुजरकर जि .इयत्ता 10 वि.मध्ये धानोरा गावातुन 90 .टक्के गुण घेऊन प्रथम आली तिच्या हस्ते आज या अमृत महोत्सवी स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहण करण्यात आले. यापूर्वीही भारतीय सेनेत कार्यरत असलेल्ये माजी सैनिक ईद्रजित लभाने व आता कार्यरत असलेले अनिकेत उराडे या सैनिकांच्या हस्ते धानोरा शाळेत ध्वजारोहण करण्यात आले होते.या पुढे सुध्या असे उपक्रम राबवु असे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय कारवटकर यांनी सांगितले,तसेच अमृत महोत्सावा निमीक्त धानोरा शाळेत रूषरोपन करण्यात आले या वेळी धानोरा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय कारवटकर,उपाध्यक्षा मनिषा कनाके, सरपंच सौ. दिक्षाताई मुन, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य वाल्मीकराव मुडे,अविनाश साखरकर,उमेश हारगोडे, दुर्गादास बोरकर,चंद्रपाल लभाने,सारीकाताई पोटभरे,संगिता ताई कुभंलकर, तसेच ग्रामपंचत सर्व सदस्य गण व मुख्याध्यापक विलास डोंगरे, विजय दुर्गे, किरण देशमुख, शिक्षिका कु गायकवाड , कू केदार , शिक्षक सेविका श्रद्धा सुरकर व धानोरा येथील नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते.


