महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : आझादि का अमृत महोत्सवानिमित्त भद्रावती येथील श्री साई कॉन्व्हेन्ट मध्ये 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता विविध प्रकारच्या कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले.सर्व प्रथम संस्थेचे सचिव प्रा.अतुल गु॑डावार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्टेट आणि सि. बी.एस.सी. च्या मुला मुलींना एकञीत करून सा॑स्कृती कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले.या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका किरण कोथळे हो त्या तर प्रमुख पाहूणे म्हणून प्रा.अतुल गुऺडावार , श्रीमती काऺताताई गुऺडावार , रूपा गु॑डावार, शाळेचे मुख्याध्यापक अतुल बडकेलवार आदि मान्यवर म॑चावर उपस्थित होते.त्या न॑तर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून 10 वी च्या मुलींनी सरस्वती वंदना गाऊन कार्यक्रमास सुरुवात केली.यावेळी नर्सरी,एल. के.जी.,यु.के.जी. , पहिली ते दहावीच्या स्टेट आणि सि बी.एस.सी.च्या मुलानी देशभक्ती गीत,देश भक्तीपर भाषणं देशभक्तीपर गांण्यावर नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अतुल बडकेलवार यांनी केले.सुत्रस॑चालन राची मा॑ढरे, आणि अर्थव उपगंनल्लावार, यांनी केले तर आभार प्रदर्शन अमिर शहा यांनी केले कार्यक्रमांची सा॑गता व॑देमातरम गीतांनी झाली.कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी सर्व शिक्षक वृंदाचे सहकार्य लाभले.