अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पातूर येथे महाराष्ट्र व्होकेशनल अँड पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय आव्हाडे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी इंजी. गाझी उर रहमान, मेहताब पहेलवान, आरिफ उर रहमान सर जहागीरदार व इतर पाहुणे उपस्थित होते.प्राचार्य डॉ.राज बोरकर सरांनी आपल्या भाषणात सांगितले की, आजच्या युगात नोकऱ्यांची खूप कमतरता आहेत,अशा परिस्थितीत कमी वेळात आणि कमी खर्चात अभ्यासक्रम करून रोजगार मिळवता येतो. कार्यक्रमास उपस्थित सर्व लोकांना अभियंता गाजी उर रहमान, आरिफ उर रहमान सर, संचालक प्रा.फरहान अमीन आदींनी मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात आव्हाळे सर म्हणाले की, आजच्या युगात अल्पमुदतीचे अभ्यासक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण हे कमी कालावधीचे व कमी खर्चाचे अभ्यासक्रम आहेत, असे अभ्यासक्रम केल्याने विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल.महाराष्ट्र व्होकेशनल अँड पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, पातूरचे संचालक प्रा. मोहम्मद फरहान अमीन सर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सय्यद फैजान, सय्यद वाजिद, सय्यद साद, सागर सय्यद, अजय लोखंडे, रफिक काझी, शेहबाज खान, नोमान खान, मुसब, खिजर खान आदींनी सहकार्य केले.


