महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : येथील सुमठाना वार्डातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती समारोह समिती तर्फे बहुजन समाजाचे आदर्श राजे, आरक्षणाचे जनक, महान समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४८ व्या जयंती निमित्त एक दिवसीय जयंती महोत्सवाचे आयोजन दि. २६ जून रोजी दुपारी १२ वाजता पंचशील प्रांगण जुना सुमठाना येथे करण्यात आले आहे. या जयंती महोत्सवात ज्येष्ठ नागरिक आणि दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच संभाजी ढगे प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार अनिकेत सोनवणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रफुल्ल खुजे, डॉ. मनीष सिंग, ठाणेदार गोपाल भारती, डॉ.यशवंत पोईनकर, महेश माहुरपवार, ॲड. बाळासाहेब हिवरकर, सुनील वैद्य उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.