राजरत्न जाधव
जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर : पाण्याच्या पाईपलाइनच्या कामाला सूरवात.मौजे रमाबाई आंबेडकर नगर, रामचंद्र नगर,भारत नगर बोईसर येथे वास्तव्यास असलेल्या आदिवासी, बौद्ध व इतर मागासवर्गीय या लोकांना गेल्या २० वर्षांपासून ग्रामपंचायत बोईसरने शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले होते.वंचित बहुजन आघाडी पालघरचे जिल्हा अध्यक्ष आयु.शिवविलास सोनकांबळे यांनी ही समस्या जाणून तातडीने दखल घेतली. संबंधित अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्यात आले व शासनाचे लक्ष वेधून त्वरित पाणी पुरवठा करा. अन्यथा पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागी झाले व संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला.वरील नगराची पाण्याची तहान भागली यामुळे सर्व परिसरात आनंदाच वातावरण निर्माण होऊन नव चैतन्य निर्माण झाले आहे.


