अभिजीत फंडाट
ग्रामीण प्रतिनिधी मोरगाव भाकरे
कंचनपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आठ वर्षे पूर्ण झालेल्या पूर्ण कामाचा लेखाजोखा आठ वर्षाचा आढावा त्यानिमित्त शेतकरी संवाद हा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या फोटोचे पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी शेतकरी संवाद व शेतकऱ्यांना कशा पद्धतीने शेती विषयक हवामान याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महिला बालकल्याण सभापती स्मृती ताई गावंडे , भाजपा किसान शेतकरी जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण मोरखडे, गजानन थोरात, किशोर कुचके ,अंबादास उमाळे, पोलीस पाटील विठ्ठल शेळके, मीनाक्षी शेळके, महिला बचत गटाच्या सीआरपी ज्योती डीक्कर , उपसभापती रिता ढवळी, पंचायत समिती सदस्य शुभांगी भटकर, ज्योत्स्नाताई चोरे, ज्ञानेश्वर चौरे, पंजाबराव शेळके, नाजुकराव शेळके, गावातील सरपंच सिद्धार्थ शिरसाठ, व ग्रामपंचायत सदस्य गण उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी जगदीश चोरे, ज्ञानेश्वर शेळके, विशाल चोरे , शैलेश शेळके ,अनंता अवातीरक , सुनील चौरे, निलेश अरबट, विलास चोरे, मंगेश चोरे, राम चोरे, प्रदीप चोरे ,गोपाल शेळके, भूषण चोरे ,आनंद चोरे ,प्रथमेश चोरे, शंतनु अरबट ,हरिओम चोरे, तुषार चोरे, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन चौरे यांनी केले, तर प्रास्ताविक गावातील उपसरपंच तसेच भाजपा शेतकरी आघाडी सोशल मीडिया प्रमुख व सरपंच सेवा महासंघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शिवशंकर डीक्कर यांनी केले ,आभार प्रदर्शन महेश चौरे यांनी केले.


